|
NDA : १२ वी/१२ वीस बसलेले प्रस्तावना- केंद्रिय लोकसेवा आयोगाद्वारे वर्षातून दोनदा येणारी ही एक महत्वाची जाहिरात होय. १२ वी उत्तीर्ण किंवा १२ वीस बसलेल्या उमेदवारांना लहान वयात अधिकारी व्हायचे असेल तर त्यासाठीची सर्वात महत्वाची संस्था नॅशनल डिफेन्स अकादमी होय. तिची स्थापना खडकवासला (पुणे) येथे १६ जानेवारी १९४९ साली झाली. याला मराठीत राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी असे म्हणतात. या ठिकाणी उमेदवारांना संरक्षण सेवेच्या संपूर्ण खर्चाने जवाहरलाल नेहरु विापीठाची बी. ए./बी. एस्सी पदवी मिळते. जगातील ही एक सर्वात महत्वाची आणि उत्तम संरक्षण प्रशिक्षण केंद्र समजले जाते.
अर्ज असा भरा
अर्जाची पहिली बाजू :
कॉलम 1 : Name of exam मध्ये (संबंधित कॉलममध्ये
दिलेल्या परीक्षेचे नांव येथे लिहावे) असे लिहा. ____
च्या पुढे असलेले वर्तुळ पेन्सीलने पूर्ण गडद करावे. Year
of Exam मध्ये (संबंधित वर्ष)
असे लिहावे.
कॉलम २ : Fee कॉलममधील चौकोनात
फी भरणार्यांनी 1 तर फी न भरणार्यानी २ असे लिहावे. फी भरणार्यांनी
1 चे वर्तुळ पेन्सिलने गडद करावे तर फी न भरणार्यांनी २ चे वर्तुळ
पेन्सिलने गडद करावे.
कॉलम ३ : ३(१) जर तुम्ही
शारिरीक दृष्टा अपंग नसाल नसाल तर चौकोनात 1 लिहावे व
1 चे वर्तुळ पेन्सिलने गडद करावे. शारिरीकदृष्टा अपंग असाल तर चौकोनात
२ लहिावे व २ वर्तुळ पेन्सिलने गदड करावे.
३(२) च्या yes कॉलमचे उत्तर
होय असेल तर ३(२) चा कॉलम खालीलप्रमाणे भरावा. जर तुम्ही शारिरीकदृष्टा अपंग असाल तर
चौकोनात 1 चे लिहावे व 1 वर्तुळ गडद करावे.
जर तुम्ही आंधळे असाल तर चौकोनात २ लिहावे. २ चे वर्तुळ गडद
करावे. जर तुम्ही मुके-बहिरे असाल तर चौकोनात ३ लिहावे व ३ चे वर्तुळ
गडद करावे.
कॉलम ४ : कम्युनिटी
: जर तुम्ही जातीचे असाल तर चौकोनात
1 लिहावे व 1 चे वर्तुळ गडद करावे,
जर अनु. जमातीचे असाल तर चौकोनात २ लिहावे
व २ चे वर्तुळ गडद करावे. जर इतर मागास वर्गीय असाल तर चौकोनात
४ लिहावे व ४ चे वर्तुळ गडद करावे. अनु. जाती/जमाती/ओबीसी नसलेल्या उमेदवारांनी जनरल
म्हणून चौकोनात ४ लिहावे व ४ चे वर्तुळ गडद करावे.
कॉलम ५ : Sex : च्या
1 क्रमांकाचे वर्तुळ, पेन्सिलने गडद करावे. आणि
संबंधीत वर्तुळातील क्रमांक 1 चौकटीत लिहावा. महिला असाल तर क्रमांक
२ चे वर्तुळ, पेन्सिलने गडद करावे आणि संबंधीत वर्तुळातील क्रमांक
२ चौकटित लिहावा.
कॅलम ६ : Nationality :
जर तुम्ही भारतीय असाल तर चौकोनात 1
लिहावे व 1 वर्तुळ गडद करावे. जर तुम्ही
भारतीय नसाल तर चौकोनात २
लिहावे व २ वर्तुळ गडद करावे.
कॉलम ७ : दिलेल्या चौकटीत
आपले नाव फक्त इंग्रजीत कॅपिटल अक्षरात दहावी प्रमाणपत्रावर आहे तसेच लिहावे.
नाव लिहिताना आडनाव, नाव, वडिल/पतीचे नांव
यामध्ये एक चौकट रिकामी सोडावी. संबंधित चौकटीतील अक्षराखालील योग्य त्या मूळाक्षराचे
वर्तुळ गडद करावे.
कॉलम ८ : जन्मतारीख
: चौकटीत दिवस, महिना,
वर्ष या क्रमाने लिहावे. त्याखालील संबंधीत क्रमांकाची वर्तुळ गडद करावीत.
कॉलम ९ : आपल्या वडिलांचे
पूर्ण नांव कॅपिटल इंग्रजी अक्षरातच लिहावे. लिहिताना आडनाव,
नांव, वडिलांचे नांव याप्रमाणे प्रत्येकी एक चौकट रिकामी सोडावी.
कॉलम १०
: केवळ निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेननेच
(पेन्सिलने नव्हे) आपला पूर्ण पत्ता इंग्रजीत
किंवा हिन्दीत लिहावा. पीन कोड लिहिण्यास विसरु नये.
कॉलम ११
: ४×५ सें.मी. आकाराचा शक्यतो
कृष्णधवल रंगाचा फोटो कॉलम ११ मध्ये चिकटवावा. मात्र तो साक्षांकित (Affested)
करु नये. फोटोस पीन मारु नये.
कॉलम १२
: ज्याना फी आहे त्यांनी संबंधित पदासाठी असलेल्या
रक्कमेचा एकच सेंट्रल रिक्रुटमेंट फी स्टॅम्प या १२ क्रमांकाच्या कॉलममध्ये
चिकटवावा. चिकविल्यानंतर Spece for Cancellation stamp असे लिहिलेल्या
जागेवर पोस्टाचा शिक्का मारून तो स्टँप कॅन्सल करुन घ्यावा.
अर्जाची दुसरी बाजू
कॉलम १३
:
(I व II) तुम्ही अतिदूर (Assam,
Meghalaya, Arunachal Pradesh, Mizoram, Manipur, Nagaland, Tripura, Sikkim, Jammu
& Kashmir, Lahaul and Spift District and Pangi Sub Division of Chamba District
of Himachal Pradesh, Andaman & Nicobar Islands, Lakshadweep, Abroad)
ठिकाणी किंवा परदेशी रहात असाल तर Yes चे वर्तुळ गडद
करावे.
No असेल तर No चे वर्तुळ गडद
करावे. चौकटीत
No चा २ हा क्रमांक लिहावा.
कॉलम १४
: महाराष्ट्रातील, कर्नाटकातील
आणि गोव्यातील उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र कोड क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
Bangalore-03, Mumbai (Bombay) 05, Nagpur 13, Panji
(Goa)-36, Dharwar -39 चौदा क्रमांकाच्या चौकटीत वरीलप्रमाणे योग्य तो
परीक्षा केंद्र कोड क्रमांक लिहावा व संबंधित क्रमांकाचे वर्तुळ पेन्सिलने गडद करावे.
इतर परीक्षा केंद्रे व कोड
क्रमांक पुढीलप्रमाणे-Ahmedabad-01, Allahabad-02, Bhopal-04, Calcutta-06,
Cuttack-07, Delhi-08, Dispur (Guwahati)-09, Hyderabad-10, Jaipur-11, Chennai (Madras)-12,
Patna-15, Shillong-16, Shimla-17, Srinagar-18, Thiruvananthapuram (Trivandrum)-19,
Kochi (Cochin)-24, Lucknow-26, Jammu-34, Chandigarh-35, Port Blair-37, Madurai-40,
Gangtok-42, Kohima-43, Imphal-44, Agartala-45, Jorthat-46, Aizawl-47, Itanagar-48,
Raipur-49, Tirupati-50, Vishakhapatnam-51, Udaipur-52, Sambalpur-53, Bareilly-54
कॉलम १५
: शैक्षणिक पात्रतेचे कोड क्रमांक खालीलप्रमाणे
आहेत. कोड ०१- जर तुम्ही पदवीधर असाल तर कोड नंबर 01 असा
आहे. कोड ०२- जर तुम्ही पदवीच्या अंतिम परीक्षेस बसला असाल तर त्यासाठी कोड
क्र. ०२ असा आहे. योग्य तो कोड नंबर पाहून वर्तूळ गडद करावे.
कॉलम १६
(१) जर तुम्ही वयाची सवलत घेत
असाल तर 1 क्रमांकाचे वर्तुळ गडद करावे आणि चौकोनात
1 असे लिहावे. जर तुम्ही वयाची सवलत घेत नसाल तर चौकोनात २ लिहावे व २ वर्तुळ गडद करावे.
कॉलम १६
(२) जर तुम्ही वयात सवलत घेत असाल
तर योग्य ते कोड क्रमांक लिहावेत. अनु. जाती आणि जमाती- 01, इतर मागासवर्गीय
-०२, अपंग-०६, अनु. जाती/जमातीचे
अपंग-०७, इतर मागासवर्गीय अपंग-०८, इत्यादी
कोड क्रमांक असून या शिवाय वयाच्या सवलतीचे अधिक कोड क्रमांकासाठी कृपया
'नोकरी-संदर्भ' कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा
दि. १९ जानेवारी ते २५ जानेवारी २००२ चा एम्प्लायमेंट न्यूज पहावा.
कॉलम १७
I : हा कॉलम नॅशनल
डिफेन्स अकादमी (NDA) आणि नेव्हीचा
असून त्यामध्ये जाहिरातीत दिलेल्या सुचनेप्रमाणे आर्मी, नेव्ही,
एअरफोर्स, नेव्ही अकादमी यांचे प्राधान्यक्रम लिहावे
लागतात.
कॉलम १७ II : नॅशनल डिफेन्स
अकादमीकरिता उमेदवार अविवाहित असणे आवश्यक असल्याने त्यासाठी हा कॉलम आहे.
कॉलम १७ III :
नॅशनल डिफेन्स अकादमीकरिता सैनिक स्कुलमध्ये शिकलेल्या उमेदवारांना काही सवलती असतात
त्यासाठी हा कॉलम आहे.
कॉलम १७ IV : नॅशनल डिफेन्स
अकादमीकरिता जे उमेदवार संरक्षण सेवेतील अधिकार्यांचे (JCO, NCO, OR इ.) मुले आहे
त्यांच्यासाठी काही सवलती असतात त्यासाठी हा कॉलम आहे.
कॉलम १८ : हा जिऑलॉजिस्ट
पदासाठी आहे
कॉलम १९ : हा कॉलम
IAS/IPS (सिर्व्हिल सर्व्हिसेस परीक्षा) यांच्यासाठी असून
त्यातील एक उपकॉलम वैकल्पिक विषयांसाठी आहे तर दुसरा उपकॉलम या परीक्षेस कितीवेळा प्रयत्न
केला त्यासाठी आहे.
कॉलम २०
:
हा कॉलम इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेससाठीअसून त्यातील एक उपकॉलम
पहिल्या वैकल्पिक विषयासाठी तर दुसरा उपकॉलम दुसर्या वैकल्पिक विषयांसाठी आहे. तसेच
त्यापुढे किती वेळा परीक्षेस बसला त्याचाही एक उपकॉलम आहे.
कॉलम २१
: हा कॉलम इंजिनियरींग सर्व्हिसेस एक्झामिनेशन करीता
असून उमेदवारांनी सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल,
इलेक्ट्रॉनिक्स आँड टेलिकम्युनिकेशन यापैकी जो संबंधीत विषय असेल तो विषय
प्रत्यक्ष अर्जात दिलेल्या कोड क्रमांकाचे वर्तुळ गडद करावे लागते.
कॉलम २२
: हा कॉलम कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस परीक्षेसाठी असून त्यातील
एक उपकॉलम पद प्राधान्याचा आहे. त्यात इंडियन मिलिटरी अकादमी, नेव्ही अकादमी,
एअरफोर्स अकादमी आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी असे चार पर्याय आहेत. जाहिरातीत
दिलेल्या सूचनांप्रमाणे उमेदवारांना प्राधान्य ावे लागते. यातील दुसरा उपकॉलम उमेदवार
विवाहीत आहे की अविवाहित यांच्याशी निगडीत आहे. तिसरा उपकॉलम उमेदवारांनी
NCC C प्रमाणपत्र प्राप्त केले आहे की नाही त्यासाठी
असून ते आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांचे
आहे की नाहीच हे लिहावे लागते. यातील पुढचा उपकॉलम सध्या संरक्षण सेवेत कार्यरत आहात
की नाहीत यासाठी आहे.
कॉलम २३
: हा कॉलम Declaration चा असून डिक्लरेशनच्या
मोकळ्या जागेत
Commission Notice No. (जाहिरातीत दिल्याप्रमाणे) असे लिहावे लागते आणि dated
च्या पुढील रिकाम्या जागेत
(जाहिरातीत दिल्याप्रमाणे तारीख) असे लिहावे लागते.
Place : या कॉलममध्ये
ज्या ठिकाणाहून अर्ज करणार त्या ठिकाणाचे नांव लिहावे लागते तर Date : च्या कॉलममध्ये
ज्या तारखेस अर्ज करणार ती तारीख लिहावी लागते.
कॉलम २४
: या कॉलमच्या चौकटीत उमेदवाराने सही करणे सक्तीचे
आहे. सही नसलेले अर्ज नाकारले जातात याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. |
||||||||||||